लोकसेवा
ग्रामपंचायत पिंपरी मार्फत पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांची माहिती.
उपलब्ध दाखले व प्रमाणपत्रे
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपण खालील सेवांचा लाभ घेऊ शकता.
जन्म नोंदणी व प्रमाणपत्र
खेडेगावात जन्मलेल्या बालकाची नोंद २१ दिवसांच्या आत ग्रामपंचायतीकडे करणे अनिवार्य आहे.
- ✓ अर्ज
- ✓ आई-वडील यांचे आधारकार्ड
- ✓ आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
- ✓ आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे
प्रक्रिया :
जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र
व्यक्तीच्या मृत्यूनंतर २१ दिवसांच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे.
- ✓ विहित नमुन्यातील अर्ज
- ✓ मृताचे आधार कार्ड
- ✓ दवाखाना / पोलिस स्टेशन दाखला
प्रक्रिया :
मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
विवाह नोंदणी व प्रमाणपत्र
महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार विवाह नोंद करणे अनिवार्य आहे.
- ✓ विवाहाचे ज्ञापन
- ✓ वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
- ✓ शाळा सोडल्याचा दाखला
- ✓ आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
- ✓ रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
- ✓ लग्नपत्रिका
- ✓ शपथपत्र
- ✓ लग्नाचे फोटोग्राफ्स
- ✓ पासपोर्ट फोटो (२)
- ✓ तीन साक्षीदार फोटो (२)
- ✓ घटस्फोट आदेश प्रत (असल्यास)
- ✓ पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र (असल्यास)
प्रक्रिया :
प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.
दारिद्र्य रेषेखालील (BPL) दाखला
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त असलेला दाखला.
- ✓ विहित नमुन्यातील अर्ज
- ✓ रेशन कार्ड झेरॉक्स
प्रक्रिया :
यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.
नमुना नं ८ चा उतारा
मालमत्तेची नोंद असलेल्या कर रजिस्टरचा उतारा (घरपट्टी उतारा).
- ✓ विहित नमुन्यातील अर्ज
- ✓ मालमत्ता कर पावती
प्रक्रिया :
नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायतीचा कोणताही कर थकीत नसल्याचे प्रमाणपत्र (बँक कामासाठी उपयुक्त).
- ✓ विहित नमुन्यातील अर्ज
- ✓ सर्व करांचा भरणा केल्याची पावती
प्रक्रिया :
नमुना नं 9 रजिस्टरवरून नाव तपासून प्रमाणपत्र दिले जाते.
निराधार असल्याचा दाखला
कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.
- ✓ अर्ज
- ✓ कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया :
चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.
सेवा कशा प्राप्त कराव्यात?
सोप्या ३ टप्प्यांत आपले प्रमाणपत्र प्राप्त करा.
अर्ज सादर करा
आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सादर करा.
कागदपत्र पडताळणी
ग्रामविकास अधिकारी किंवा लिपिक आपल्या कागदपत्रांची पडताळणी करतील.
प्रमाणपत्र प्राप्त करा
विहित मुदतीत आपले स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र कार्यालयातून घेऊन जा.
कर भरणा QR Code
ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी खालील QR कोडचा वापर करा.
ग्रामनिधी
GRAMPANCHAYAT ADMIN PANEL
सूचना: पेमेंट केल्याचा screen shot, मिळकत धारकाचे नाव, मालमत्ता क्रमांक ही माहिती पावतीसाठी ग्रामपंचायतीला त्याच दिवशी कळवावी.
पाणीनिधी
GRAMPANCHAYAT ADMIN PANEL
सूचना: पेमेंट केल्याचा screen shot, मिळकत धारकाचे नाव, मालमत्ता क्रमांक ही माहिती पावतीसाठी ग्रामपंचायतीला त्याच दिवशी कळवावी.
डाऊनलोड सेंटर
सर्व महत्त्वाचे अर्ज पीडीएफ स्वरूपात उपलब्ध.